मागे (Home)
श्री दुर्गा / महालक्ष्मीआरती~2 मिनिटे

अंबे मातेची आरती (नवरात्री विशेष आरती)

अंबे कृपा करीं अंबे कृपा करीं ।

नवरानीच्या दिनीं वास करीं अंतरीं ॥ ध्रु० ॥

प्रथम शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी ।

तिसरी चंद्रघंटा कुष्मांडा तारिणी ॥ १ ॥

पंचमी स्कंदमाता षष्ठी कात्यायनी ।

सप्तमी कालरात्री महागौरी पावनी ॥ २ ॥

नवमी सिद्धीदात्री नवदुर्गा रूप ।

अनंत महिमा तुझा अपार प्रताप ॥ ३ ॥

अंबे कृपा करीं अंबे कृपा करीं ॥ ध्रु० ॥

घटस्थापना केली तुळजापूर वासिनी ।

भक्तांच्या संकटी धावे सिंहवाहिनी ॥ ४ ॥

दास अनन्य तुझा चरणीं लीन झाला ।

जय जय दुर्गे माते भवतारक आला ॥ ५ ॥

अंबे कृपा करीं अंबे कृपा करीं ॥ ध्रु० ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस