मागे (Home)
श्री दुर्गा / महालक्ष्मीआरती~4 मिनिटे

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने (श्री अंबा आरती)

रचनाकार: त्र्यंबक मधुकर (Trimbak Madhukar)

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।

गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ।

सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।

भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ।

कोल्हापुराधिसामिणि तुज वो जगदंबे ॥ धृ. ॥

मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।

कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।

रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।

चिद्गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ २ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ॥ धृ. ॥

कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें ।

पीतांबर सुंदर कसियेला काँसे ।

कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।

पदमकमल लावण्ये अंबा शोभतसे ॥ ३ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ॥ धृ. ॥

झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी ।

तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।

ब्रह्महरिहर सकळीक नेणति तव करणी ।

अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ ४ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ॥ धृ. ॥

अष्टहि भूजा सुंदर शोभतसे ।

झगझगझगझगझगझगती लावण्यगाभा ।

म्हाम्हाम्हाम्हाम्हाम्हाम्हागीत समनांची शोभा ।

त्र्यंबक मधुकर होऊनि वर्णितसे अंबा ॥ ५ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस