जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ॥ धृ. ॥
भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामाने ॥ १ ॥
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ॥ धृ. ॥
नानापरिची पुष्पे द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनी ब्राह्मण संतर्पण करिती ॥ २ ॥
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ॥ धृ. ॥
अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपती ॥ ३ ॥
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ॥ धृ. ॥
रामा धर्मे आचरीतां व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजितां तुजला उद्धरिले त्याला ॥ ४ ॥
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ॥ धृ. ॥
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५ ॥
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ॥ धृ. ॥