आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा ।
न चलती उपचार । मनें सारिली पूजा ॥ धृ. ॥
परेस पार नाहीं । न पडे निगमा ठायीं ।
भुलला भक्तिभावें । लाहो घेतला देहीं ॥ १ ॥
आरती अनंतभुजा विठो पंढरीराजा ॥ धृ. ॥
अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ।
रामाजनार्दनीं । पायीं जोडिली वीट ॥ २ ॥
आरती अनंतभुजा विठो पंढरीराजा ॥ धृ. ॥