नानादेहीं देव एक विराजे ।
नाना नाटकलीला सुंदर रूप साजे ।
नाना तीर्थीं क्षेत्रीं अभिनव गति माजे ।
अगाध महिमा पिंड ब्रह्मांडीं गाजे ॥ १ ॥
जय देव जय देव जय आत्मारामा ।
निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥
बहुरुपी बहुगुणी बहुतां काळचा ।
हरिहर ब्रह्मादिक देव सकळाचा ।
युगानुयुगीं आत्माराम आमुचा ।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ २ ॥
जय देव जय देव जय आत्मारामा ॥ धृ. ॥