मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता (श्रीमद्भागवत महापुराण आरती)

रचनाकार: संत एकनाथ महाराज (Sant Eknath)

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ।

श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ. ॥

वेदांचें हें सार पाहे रसभरित ।

दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ १ ॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ॥ धृ. ॥

द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।

तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ २ ॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ॥ धृ. ॥

अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती ।

ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ॥ ३ ॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ॥ धृ. ॥

गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें ।

परीक्षिति-शुकसंवाद आहे ॥ ४ ॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ॥ धृ. ॥

भागवतरूपी देवा तूंचि अहेसी ।

करूं ही आरति एका-जनार्दनासी ॥ ५ ॥

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ॥ धृ. ॥

चरण1/6

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस