मागे (Home)
भगवान विष्णूआरती~4 मिनिटे

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

पद्मसम पादयुग्मरंगा । ओंवाळणी होति भृंगा ।

नखमणि श्रवताहे गंगा । जे कां त्रिविधतापभंगा ।

प्रचालप्र वर्तुळ गुल्फ भ्राजमाने । किंकिणीक्वणितरु नाद घणघणितरु बांकिवर झुणितरु नेपुरें झनन मंजिरीची । झनन ध्वनी मंजिरीची ॥ १ ॥

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंबसुस्थानीं ।

नाभिची अगाध हो करणी । विश्वजनकाची जे जननी ।

प्रचालप्र त्रिवलीकलित उदरशोभा ।

कुंकुगळां माळ विलम्बितरु झळाळ कौस्तुभरु सरळ बाहु श्रिवत्स तरल मणि मरळ कंकणाची । प्रीति बहुरु जडित कंकणाची ॥ २ ॥

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणाकंपबिंबवदना ।

पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेयदि दैत्यदमना ।

प्रचालप्र झळकत महरकुंडलाभा ।

कुटिल कुंतलिरु मधुरपत्रावली वेष्टिलीरु तिलक भालिंरु केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची । अक्षता काळि कस्तुरीची ॥ ३ ॥

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

कल्पद्रुमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदीप्ती ।

गोपीगोपवलयंभवंती । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ।

प्रचालप्र मंजुळ मधुर मुरलिनदें ।

चकित गंधर्वरु चकित अप्सरारु सुरागिरिवरारु धरा कर्पूरारतीने प्रेमयुक्त सची । आरती ओंवळित साची ॥ ४ ॥

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी ।

श्रमलों भवाब्धिचे फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ।

प्रचालप्र अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।

नमितों चरण शरणरु मी करुणा येऊं दे विशालपाणीरु कृष्ण नेणतें बाळ आपुलेंरु राखि लाज याची ॥ ५ ॥

आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

चरण1/6

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस