मागे (Home)
समर्थ रामदास स्वामीआरती~2 मिनिटे

वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला (श्री दासबोधांची आरती)

रचनाकार: कल्याण स्वामी (Kalyan Swami)

वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला ।

श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष सांगू केला ।

महानुभव संतजनी अनुभव चाखियला ।

अज्ञान जड जीवां मार्ग सुगम केला ॥ १ ॥

जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ।

आरती ओंवाळीन विमलज्ञान बाळबोधा ॥ धृ. ॥

नवविधा भक्तिपंथें रामरूपानुभवी ।

चातुर्यनधि मोठा मायाचक्र उघवी ।

हरिहर हृदयांचे गुह्य प्रगट दावीं ।

बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी ॥ २ ॥

जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ॥ धृ. ॥

वीसही दशकींचा अनुभव जो पाहे ।

नित्यनेमें विवरीतां स्वयें ब्रह्मची होये ।

अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाही ।

कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयीं ॥ ३ ॥

जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस