मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

जय देव जय देव जय पांडुरंगा दीपारति ओवाळूं (नित्य दीपारती)

रचनाकार: विष्णुदास (Vishnudas)

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ॥ धृ. ॥

स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ती ।

पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ।

देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ।

ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ॥ १ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ धृ. ॥

देव तुज पाहता येतो प्रेमपूर ।

नाम निरंतर गातां होतो भवपार ।

वाटे तव भक्ती ही प्रियकर ।

विष्णुदासा देई अखंड हा वर ॥ २ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस