मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

जय देव जय देव पंढरीराया धूप अर्पीतसें (नित्य धूपारती)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

जय देव जय देव पंढरीराया ।

धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ॥ धृ. ॥

सोज्ज्वळ अग्निरुप निजतेजोराशी ।

अहंभाव धूप कृपें जाळीसी ।

त्याचा आनंद माझे मानसीं ।

तव दर्शनमोदें सुख हें सर्वांसी ॥ १ ॥

जय देव जय देव पंढरीराया ॥ धृ. ॥

पूर्णानंद देवा तूं सच्चिदानंदा ।

परमात्मा तूं अससी आनंदकंदा ।

पूर्ण करीं तूंची भक्तांच्या छंदा ।

अंगीकारुन धूप दे ब्रह्मानंदा ॥ २ ॥

जय देव जय देव पंढरीराया ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस