मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~3 मिनिटे

माते दर्शनमात्रें प्राणी उद्धरिसी (गंगामाईची आरती)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

माते दर्शनमात्रें प्राणी उद्धरिसी ।

हरिसी पातक अवघें जग पावन करिसी ।

दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।

हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय गंगाबाई ।

पावन करि मज सत्वर विश्वाचे आई ॥ धृ. ॥

पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलों ।

विषयांचे मोहानें त्यांतचि रत झालों ।

त्याचे योगे दुष्कृत सिंधूत बुडालों ।

त्यांतुनि मजला तारिसि ह्या हेतूनें आलों ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय गंगाबाई ॥ धृ. ॥

निर्दय यमदूत नेती त्या समयीं राखीं ।

क्षाळीं यमधर्माच्या खात्यातील बाकी ।

मत्संसंगति जन अवघे तारियले त्वां की ।

उरलो पाहें एकचि मी पतितांपैकी ॥ ३ ॥

जय देवी जय देवी जय गंगाबाई ॥ धृ. ॥

अघहरणे जय करुणे विनवितसे भावें ।

नोपेक्षी मज आतां त्वत्पात्रीं घ्यावें ।

केला पदर पुढे मी मज इतकें द्यावें ।

जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावें ॥ ४ ॥

जय देवी जय देवी जय गंगाबाई ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस