मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती (काकड आरती ३)

रचनाकार: समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami)

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ।

जीवशिव ओवाळीन निर्जी निजात्मज्योती ॥ धृ. ॥

त्रिगुण काकडा द्वैतघृतं तिंबिला ।

उजळीतों आत्मज्योती तेणें प्रकाशला ॥ १ ॥

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ॥ धृ. ॥

काजळी तामस अवधें तेज डळमळ ।

अवनी आवर अवघा निग निज निश्चळ ॥ २ ॥

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ॥ धृ. ॥

उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।

रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥ ३ ॥

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस