हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ. ॥
एकीकडे राई एकीकडे रखुमाई ।
भावें ओवाळिता हरिसि तूं होसी दो ठाईं ॥ १ ॥
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका ॥ धृ. ॥
अष्टाधिक सोळा सहस्र ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा ।
जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ २ ॥
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका ॥ धृ. ॥
एका जनार्दनी हरी तूं लाघवी होसी ।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ ३ ॥
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका ॥ धृ. ॥