मागे (Home)
श्री कृष्ण / बालकृष्णआरती~2 मिनिटे

ओवाळूं आरती मदनगोपाळा (श्री कृष्णाची आरती १)

रचनाकार: संत एकनाथ महाराज (Sant Eknath)

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।

श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ. ॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार ।

ध्वजवज्रांकुश ब्रीदाते तोडर ॥ १ ॥

ओवाळूं आरती मदनगोपाळा ॥ धृ. ॥

नाभिकमलीं ज्याचें ब्रह्माचें स्थान ।

हृदया पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥

ओवाळूं आरती मदनगोपाळा ॥ धृ. ॥

मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी ।

मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ॥ ३ ॥

ओवाळूं आरती मदनगोपाळा ॥ धृ. ॥

जडितमुगुट ज्याच्या देदीप्यमान ।

तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ॥ ४ ॥

ओवाळूं आरती मदनगोपाळा ॥ धृ. ॥

एका जनार्दनीं देखियेले रूप ।

रूप पाहों जातां झालेंसें तद्रूप ॥ ५ ॥

ओवाळूं आरती मदनगोपाळा ॥ धृ. ॥

चरण1/6

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस