मागे (Home)
श्री कृष्ण / बालकृष्णआरती~1 मिनिटे

सहस्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा (श्री कृष्णाची काकड आरती)

रचनाकार: संत एकनाथ महाराज (Sant Eknath)

सहस्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा ।

उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥ १ ॥

कांकड आरति माझ्या कृष्ण सभागिया ।

चराचर मोहरलें तुझी मूर्ती पहाया ॥ धृ. ॥

कोंदलेंसें तेज प्रभा झालीसे एक ।

नित्य नवा आनंद ओंवाळितां श्रीमुख ॥ २ ॥

कांकड आरति माझ्या कृष्ण सभागिया ॥ धृ. ॥

आरति करितां तेज प्रकाशलें नयनीं ।

तेणें तेजें मीनला एका एकीं जनार्दनीं ॥ ३ ॥

कांकड आरति माझ्या कृष्ण सभागिया ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस