मागे (Home)
समर्थ रामदास स्वामीआरती~1 मिनिटे

वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार (मनोबोधाची आरती - मनाचे श्लोक)

रचनाकार: यशवंत सद्गुरु दास (Yashwant Sadguru Das)

वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार ।

प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार ।

कर्म उपासना ज्ञान गंभीर ।

ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥

जय देव जय देव जय मनोबोधा ।

पंचप्राणें आरति तुज स्वात्मशुद्धा ॥ जय देव जय देव ॥ धृ. ॥

दोन शतें पांच श्लोक हे जाण ।

श्रवणें अर्थे साधक पावती हे खूण ।

परमार्थी सुलभ मार्ग हा पूर्ण ।

यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥ जय देव जय देव ॥

चरण1/2

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस