जय देव जय देव जय विठाबाई ।
पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ॥ धृ. ॥
षड्रसपक्वान्नें हीं अर्पित तुज माई ।
कृपा करुनी तीं तूं मान्य करुनि घेई ।
तृप्ती सर्व जीवां जेवितां तूं आई ।
जीवन सर्वांचें हें असे तव पायीं ॥ १ ॥
जय देव जय देव जय विठाबाई ॥ धृ. ॥
आनंदें भोजन करावें आतां ।
यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ।
प्रसाद तो देई आपुल्या भक्ता ।
हेंचि मागें ठेवूनि तव चरणीं माथा ॥ २ ॥
जय देव जय देव जय विठाबाई ॥ धृ. ॥