मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

पंचप्राणांचें नीरांजन करुनी (नीरांजन आरती)

रचनाकार: शिवराम (Shivaram)

पंचप्राणांचें नीरांजन करुनी ।

पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरूनी ।

मोहममतेनें समूळ भिजवोनी ।

अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ॥ १ ॥

जय देव जय देव जय नीरांजना ।

नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ॥ धृ. ॥

ज्वाला ना काजळी दिवस न राती ।

सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ।

पूर्णानंदें धाालों बोलों मी किती ।

उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ॥ २ ॥

जय देव जय देव जय नीरांजना ॥ धृ. ॥

चरण1/2

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस