मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~4 मिनिटे

अघसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा (श्री पंचायतन आरती)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

अघसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा ।

आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।

पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा ।

निजवर देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ॥ १ ॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती ।

गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ॥ धृ. ॥

पयसागरजाकांता धरणीधरशयना ।

करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।

गरुडध्वज भजन प्रिय पीतप्रभवसना ।

अनुदिनि तव कीर्तनरस चाखो हे रसना ॥ २ ॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती ॥ धृ. ॥

नंदीवहना गहना पार्वतीच्या रमणा ।

मन्मथदहना शंभो वातातमजनयना ।

सर्वोपाय विवर्जित तापत्रयदमना ।

कैलासाचलवासा करिसी सुरनमना ॥ ३ ॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती ॥ धृ. ॥

पद्मबोधकरणा नेत्रभ्रमहरणा ।

गोधन बंधनहरता द्योतक आचरणा ।

किरण स्पर्श वारिसि या तम आवरणा ।

शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा ॥ ४ ॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती ॥ धृ. ॥

त्रिभुवनउत्पति पालन करिसीइ तूं माया ।

नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ।

तुझा गुणगणमहिमा न कळे निगमा या ।

करुणा करिसी अंबे मनविश्रामा ॥ ५ ॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस