मागे (Home)
श्री रामचंद्रआरती~2 मिनिटे

रत्नांची कुंडलें माला सुविराजे (श्री रामचंद्रांची आरती ४)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

रत्नांची कुंडलें माला सुविराजे ।

झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ।

घंटा किंकिणि अंबर अभिनव गति साजे ।

अंदु वांकी तोडर नुपुर ब्रीद गाजे ॥ १ ॥

जय देव जय देव जय रघुवर ईशा ।

आरती निर्जरवर ईशा जगदीशा ॥ धृ. ॥

राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी ।

परातपर अभयंकर शंकर वरधारी ।

भूषणमंडित उभा त्रिदश कैवारी ।

दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥ २ ॥

जय देव जय देव जय रघुवर ईशा ॥ धृ. ॥

चरण1/2

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस