मागे (Home)
श्री रामचंद्रआरती~1 मिनिटे

त्रिभुवनमंडित माळ गळां (श्री रामचंद्रांची आरती २)

रचनाकार: विष्णुदास नामा (Vishnudas Nama)

त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥

श्रीराम जयराम जयजय राम । आरति ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्याम ॥ धृ. ॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ २ ॥

श्रीराम जयराम जयजय राम ॥ धृ. ॥

भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ॥ ३ ॥

श्रीराम जयराम जयजय राम ॥ धृ. ॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी । आरती ओवाळूं चौदा भुवनांच्या कोटी ॥ ४ ॥

श्रीराम जयराम जयजय राम ॥ धृ. ॥

विष्णुदास नामा म्हणे मागंतो तूतें । आरति ओवाळूं पाहूं सीतापतीतें ॥ ५ ॥

श्रीराम जयराम जयजय राम ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस