मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची (श्री सद्गुरूंची आरती ३)

रचनाकार: श्रीरंगात्मज विठ्ठल (Shrirangatmaj Vitthal)

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ।

झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ॥ धृ. ॥

पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी ।

सर्वही तीर्थे घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ॥ १ ॥

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ॥ धृ. ॥

मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती ।

नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ॥ २ ॥

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ॥ धृ. ॥

कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।

लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥ ३ ॥

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ॥ धृ. ॥

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी ।

अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ॥ ४ ॥

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ॥ धृ. ॥

प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला ।

श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ॥ ५ ॥

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ॥ धृ. ॥

चरण1/6

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस