मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~1 मिनिटे

सगुण हे आरती निर्गुण ओवाळूं (श्री सद्गुरूंची आरती १)

रचनाकार: रामानंद (Ramanand)

सगुण हे आरती निर्गुण ओवाळूं ।

कल्पनेचें घृत घालून दीप पाजळूं ॥ १ ॥

ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा ।

भावें चरणकमळावरी ठेविला माथा ॥ धृ. ॥

अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ।

आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥ २ ॥

ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा ॥ धृ. ॥

सद्गुरूचे पूजन केले षोडशोपचारे ।

रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ॥ ३ ॥

ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस