आरती संग्रह

Aarti Sangraha

मागे (Home)
शिर्डीचे साईबाबा•आरती•~6 मिनिटे

आरती साईनाथांची (जय देव जय देव जय साईनाथा श्री सद्गुरुनाथा)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

जय देव जय देव जय साईनाथा । श्री सद्गुरुनाथा ।

विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ॥ जय देव ॥ धृ. ॥

ब्रह्मांडाचा नायक देवा तू कळले ।

प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले ।

ब्रह्मा विष्णु शङ्कर गणपती तू त्राता ।

भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

हरूनी दारिद्र्याते रंका रक्षियले ।

रोगग्रस्तां तुझिया उदीने तारियले ।

वांझेसी तोषविलें देउनिया पुत्रा ।

जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता ॥ २ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना ।

सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना ।

ऐशी तू सकलांची ममताळू माता ।

रोमांचित तनु होई गुण महिमा गातां ॥ ३ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले ।

आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले ।

ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां ।

शिणली मति मग आलों शरण तुला नाथा ॥ ४ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

मद्वचनी विश्वासुनि जे सेवा करिती ।

त्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी ।

ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता ।

करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा ॥ ५ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

समतेची योगाची मूर्ती श्री साई ।

ऋद्धिसिद्धी घेती लोळण तव पायीं ।

अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता ।

अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता ॥ ६ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

लाभे फळ करितां तव नवस समाधीला ।

दाखविसी अद्यापी निज अगाध लीला ।

चुकतां पथ दर्शविसी देउनि दृष्टांता ।

हीना दीनांचा तू स्वामी हितकर्ता ॥ ७ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

जन्मोजन्मी मजला घडुं दे श्रीदेवा ।

आशीर्वचनाची तव लाभो मज सेवा ।

घालुनिया लोटांगण याचितसे नाथा ।

पापात्मा मी यास्तव लोटूं नका परता ॥ ८ ॥

जय देव जय देव जय साईनाथा ॥ धृ. ॥

चरण1/9

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस