धन्य धन्य रामदास । स्वामी समर्थांचा दास ॥
आरती ओंवाळूं । पूर्ण करीं मनींची आस ॥ ध्रु० ॥
प्रगटले रामभक्त । सज्जनगडीं वास ।
जन उद्धाराया केला । दासबोध अभ्यास ॥ १ ॥
मारुतीची स्थापना । गावोगांवी केली ।
महाराष्ट्र धर्माची । ध्वजा उंच नेली ॥ २ ॥
धन्य धन्य रामदास । स्वामी समर्थांचा दास ॥ ध्रु० ॥
कल्याण म्हणे स्वामी । चरण न सोडीं मी ।
अखंड मज ठेवा । आपल्या सेवेमी ॥ ३ ॥
धन्य धन्य रामदास । स्वामी समर्थांचा दास ॥ ध्रु० ॥