आरती संग्रह

Aarti Sangraha

मागे (Home)
संत एकनाथ महाराज (पैठण)•आरती•~1 मिनिटे

श्री एकनाथांची आरती (आरती एकनाथा महाराजा समर्था)

रचनाकार: अनंत गोपाळदास (Anant Gopaldas)

आरती एकनाथा । महाराजा समर्था ।

त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ॥ धृ. ॥

एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ।

संसारदुःखनाश । महामंत्राचें बीज ॥ १ ॥

आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥ धृ. ॥

एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ।

अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ॥ २ ॥

आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस