आरती संतमंडळी ॥
हातीं घेउनि पुष्पांजली ओवाळिन पंचप्राणें ।
त्याचे चरण न्याहाळी ॥ धृ. ॥
मच्छेंद्र गोरख । गैनी निवृत्तिनाथ ।
ज्ञानदेव नामदेव । खेचर विसोबा संत ।
सोपान चांगदेव । गोरा जगमित्र भक्त ।
कबीर पाठक नामा । चोखा परसा भागवत ॥ १ ॥
आरती संतमंडळी ॥ धृ. ॥
भानुदास कृष्णदास । वडवळसिद्ध नागनाथ ।
बहिरा पिसा मुकुंदराज । केशवस्वामी सूरदास ।
रंगनाथ वामनस्वामी । जनजसवंत दास ॥ २ ॥
आरती संतमंडळी ॥ धृ. ॥
एकनाथ रामदास । यांचा हरि पदीं वास ।
गुरुकृपा संपादिली । स्वामी जनार्दन त्यास ।
मीराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास ।
सोनार नरहरी हा । माळी सांवता दास ॥ ३ ॥
आरती संतमंडळी ॥ धृ. ॥
रोहिदास संताबाई । जनी राजाबाई गोणाई ।
जोगापरमानंदसाल्या । शेखमहंमद भाई ।
निंबराज बोधराज । माथा तयांचें पायीं ।
कूर्मदास शिवदास । मलुकदास कर्माबाई ॥ ४ ॥
आरती संतमंडळी ॥ धृ. ॥
नारा म्हादा गोंदा विठा । प्रेमळ दामाजी ।
तुकोबा गणेशनाथ । सेना नरसी महत ।
तुलसीदास कसांबया । पवार संतोबा भक्त ।
महिपती तुम्हां पासी । चरणसेवा मागत ॥ ५ ॥
आरती संतमंडळी ॥ धृ. ॥