मागे (Home)
श्री विठ्ठल (पांडुरंग)आरती~2 मिनिटे

जन्मतां पांडुरंगे जिह्वेवरी लिहिलें (संत नामदेव आरती)

रचनाकार: संत परिसा भागवत (Sant Parisa Bhagwat)

जन्मतां पांडुरंगे जिह्वेवरी लिहिलें ।

अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ॥ १ ॥

जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ।

आरती ओंवाळीतां चित्त पालटे काया ॥ धृ. ॥

घ्यावया भक्तिसुख पांडुरंगे अवतार ।

धरूनियां तीर्थमिषें केला जगाचा उद्धार ॥ २ ॥

जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ॥ धृ. ॥

प्रत्यक्ष प्रचितीं हे वाळवंट परिस केली ।

हारपली विषमता द्वैतबुद्धि निरसली ॥ ३ ॥

जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ॥ धृ. ॥

समाधि महाद्वारी श्रीविठ्ठलचरणीं ।

आरती ओंवाळीतों परिसा कर जोडुनी ॥ ४ ॥

जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस