जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।
आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ॥ धृ. ॥
सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ।
एक मुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
नवग्रहांमाजी श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ।
ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ॥ २ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ।
गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियेलें त्यासी ॥ ३ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ।
साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥ ४ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ।
नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ॥ ५ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ।
कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ॥ ६ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥
दोन्ही कर जोडुनियां । रखमा लीन सदा पायीं ।
प्रसाद हाचि मागे । उदयाकाळ सौख्य दावीं ॥ ७ ॥
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ धृ. ॥