जय जय स्वामी समर्थ । अक्कलकोटचे दत्त ॥
आरती ओवाळितां । पुरती सकळ मनोरथ ॥ ध्रु० ॥
अवधूत वेषधारी । परब्रह्म अवतारी ॥ १ ॥
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।
हे अभयवचन सदैव आठवे ॥ २ ॥
जय जय स्वामी समर्थ ॥ ध्रु० ॥
अनंत लीला ज्याच्या अगम्य अगाध ।
संकटीं धावोनिया पुरवितो साद ॥ ३ ॥
स्वामी समर्थांचे ध्यावे नाम । सफल होतील सकल काम ॥ ४ ॥
जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटचे दत्त ॥ ध्रु० ॥