आरती तुकयाची । स्वामी समर्थाची ।
जेणे हा तारिला । त्रिविध लोक तिही लोकीं ॥
आरती तुकयाची ॥ ध्रु० ॥
काम क्रोध मद मत्सर लोभ । दंभ अहंकार हा सांडिला ।
सकल देहीं तुका एक । विठ्ठलची पाहिला ॥ १ ॥
आरती तुकयाची ॥ ध्रु० ॥
अठ्ठावीस युगे विठ्ठल । उभा विटेवरी ।
तुका म्हणे मज भेटवा सत्वरीं ॥ २ ॥
आरती तुकयाची ॥ ध्रु० ॥
रामेश्वर म्हणे तुका साचार । ज्याचा अवतार जगा उद्धारावया ॥ ३ ॥
आरती तुकयाची स्वामी समर्थाची ॥ ध्रु० ॥