मागे (Home)
नित्य प्रार्थना व मंत्रआरती~2 मिनिटे

जय देवी जय देवी जय तुळसी (तुळशी मातेची आरती)

रचनाकार: गोसावीसूत (Gosavisut)

जय देवी जय देवी जय तुळसी ।

निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥ धृ. ॥

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।

अग्रीं शंकर तीर्थे शाखा परिवारीं ।

सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।

दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय तुळसी ॥ धृ. ॥

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।

मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ।

तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।

विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय तुळसी ॥ धृ. ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।

तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।

त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।

गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

जय देवी जय देवी जय तुळसी ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस