अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ।
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ।
आरती वडराजा ॥ १ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।
भावें करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ धृ. ॥
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशी ।
त्रिरात्र व्रत करूनिया । जिंकी तूं सत्यवंताशी ।
आरती वडराजा ॥ २ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ धृ. ॥
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ।
धर्मराजा उचकला । हत्या घालील जीवाला ।
येई ग पतिव्रते । पती नेई गे आपुला ।
आरती वडराजा ॥ ३ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ धृ. ॥
जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ।
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ।
आरती वडराजा ॥ ४ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ धृ. ॥
पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ।
तुझें व्रतें आचरती । तुझीं भुवनें पावती ।
आरती वडराजा ॥ ५ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ धृ. ॥
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ।
स्वर्गी पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती ।
अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ॥ ६ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ धृ. ॥