संतसनकादिक भक्त मिळाळे अनेक ।
स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ।
स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ॥ धृ. ॥
नर नारी तटस्थ टक पडिलें नयना ।
ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना ॥ २ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ धृ. ॥
एका जनार्दनी मंगल आरत्या गाती ।
मंगल कौतुकें गाती ।
मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ धृ. ॥