मागे (Home)
भगवान विष्णूआरती~2 मिनिटे

शेषाचल अवतार तारक तूं देवा (श्री व्यंकटेश बालाजी आरती)

रचनाकार: पारंपरिक (Traditional)

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।

सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ।

कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा ।

कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।

केवळ करुणासिंधु पुरवीसी आशा ॥ धृ. ॥

हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें ।

दाखविसी गुण कैसे सकाळिक लोकांतें ।

देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें ।

ध्यातों तुजला श्रीपति दृढ़ मानस होतें ॥ २ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ॥ धृ. ॥

चरण1/2

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस