आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता ।
स्वामी समर्था दयाघना आनंदाच्या नाथा ॥ ध्रु० ॥
दिवसभराची सेवा भाविकांची स्वीकारली ।
भक्तांवरी प्रेमाची अखंड छाया केली ॥ १ ॥
सुवर्ण पलंगीं मखमली गादी शोभे ।
चरणकमळीं दास अंतरीं लोभे ॥ २ ॥
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता ॥ ध्रु० ॥
भिऊ नकोस पाठीशी आहे हे वचन खरे ।
तुझ्या कृपेने दासांचे संसार झाले बरे ॥ ३ ॥
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता । स्वामी समर्था दयाघना आनंदाच्या नाथा ॥ ध्रु० ॥