धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ।
झाली हेळाफेरी तेणे भवसिंधूची ॥
जय देव जय देव जय सद्गुरुराया ।
दाविसी निजभक्तां भवभय ताराया ॥ ध्रु० ॥
पदोपदीं झाल्या दोषांच्या नाशा ।
घडली बहुपुण्यें पुरली मनींची आशा ॥
अगाध महिमा तव नामाचा जगीं ।
दत्तराज वससी भक्तांच्या हृदयीं ॥ जय देव० ॥ १ ॥
उलटोनि आली मूळची वृत्ती ।
ज्या स्थानीं बैसली सद्गुरुंची मूर्ती ॥
तेथें मन स्थिर होतां पावे समाधान ।
अखंड घडो आम्हां तव नामस्मरण ॥ जय देव० ॥ २ ॥
ब्रह्मानंद स्वामी चरणीं लीन झाला ।
दत्तात्रेय प्रभुने भवपार केला ॥
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।
अखंड वास करो आम्हां अंतरात ॥ जय देव जय देव० ॥ ३ ॥