मागे (Home)
श्री दुर्गा / महालक्ष्मीआरती~3 मिनिटे

दुर्गे दुर्घट भारी (दुर्गा देवी आरती)

रचनाकार: समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami)

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।

वारी वारीं जन्ममरणांते वारी ।

हारी पडलो आतां संकट नीवारीं ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऐसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तू भक्तांलागीं पावसि लवलाही ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।

क्लेशांपासुनी सोडीं तोडीं भवपाशा ।

अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा ।

नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस