मागे (Home)
भगवान शिवआरती~2 मिनिटे

जय देव जय देव श्रीमंगेशा (श्री शंकर आरती २)

रचनाकार: अनंतसुत (Anantsut)

जय देव जय देव श्रीमंगेशा ।

पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥ धृ. ॥

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।

गौरीरमणा आद्या मदनांतकारी ।

त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।

विश्वंभर विरुदे हें नम संकट धारीं ॥ १ ॥

जय देव जय देव श्रीमंगेशा ॥ धृ. ॥

भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।

विबुधादिक कमळासन वांच्छिती तव सेवा ।

तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।

अभिनव कृपाकटाक्षें मतित्सव द्यावा ॥ २ ॥

जय देव जय देव श्रीमंगेशा ॥ धृ. ॥

शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा ।

संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ।

कुलवृद्धीते पावती हीच असे आशा ।

अनंतसुत वांच्छितसे चरणांबुजलेशा ॥ ३ ॥

जय देव जय देव श्रीमंगेशा ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस