जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥ जय देव ॥ धृ. ॥
प्रसन्नभाळा विमला करि घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला ।
रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ॥ १ ॥
सारीगमपधनीसप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ।
तातक तातक थैय्या करिसि आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकीती तव पदारविंदा ॥ २ ॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ॥ धृ. ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलडूधर शोभित शुभवदना ।
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेHeader रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ॥ ३ ॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ॥ धृ. ॥