मागे (Home)
श्री गणेशआरती~3 मिनिटे

कपोल झिरती मदें शुण्डा बहु साजे (श्री गणेश आरती ४)

रचनाकार: गोसावीनंदन (Gosavinandan)

कपोल झिरती मदें शुण्डा बहु साजे ।

शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।

घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।

प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ॥ १ ॥

जय देव जय देव गजनरवेषा ।

आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥ धृ. ॥

विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।

हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।

अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।

ताण्डवनृत्य करिसी तातक धिम ताथा ॥ २ ॥

जय देव जय देव गजनरवेषा ।

आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥ धृ. ॥

विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।

नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।

निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।

गोसावीनंदन गातो कवितांशी ॥ ३ ॥

जय देव जय देव गजनरवेषा ।

आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस