जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ ध्रु० ॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ १ ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ २ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ॥ ध्रु० ॥
चतुराननें कुश्चित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी ॥
पुसोनि कुंकुमटीळा लाविसि या भाळी ।
तोडी भवबंधन या बाळकाची वेळी ॥ ३ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ ध्रु० ॥