लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ. ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमन माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ. ॥
देवी दैत्य सागरमंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हळाहळ जे उठिले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ. ॥
व्याघ्रांबर फणिधरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिवरसुखकारी ।
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ. ॥