मागे (Home)
श्री गणेशआरती~3 मिनिटे

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें (श्री गणेश आरती २)

रचनाकार: गोसावीनंदन (Gosavinandan)

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें ।

लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।

ऐसें पूजन केल्या बेएजाक्षर मंत्रें ।

अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ धृ. ॥

तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती ।

त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ।

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।

सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥ २ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ धृ. ॥

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।

कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ।

त्रैलोकीं ते विजयी अद्भुत हे करणी ।

गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥ ३ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ धृ. ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस