मागे (Home)
श्री विठ्ठल (पांडुरंग)आरती~2 मिनिटे

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा (श्री विठ्ठल आरती ३)

रचनाकार: संत तुकाराम महाराज (Sant Tukaram)

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।

राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ. ॥

कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।

रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ॥ १ ॥

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ॥ धृ. ॥

मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।

श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ २ ॥

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ॥ धृ. ॥

वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।

शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥ ३ ॥

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ॥ धृ. ॥

सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।

चरणींचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ॥ ४ ॥

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ॥ धृ. ॥

ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।

समाधिस्थसमान तुकया लागला पायी ॥ ५ ॥

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ॥ धृ. ॥

चरण1/6

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस