पावला प्रसाद आता विठो निजावे ।
आपला तो श्रम कळो येतसे भावे ॥ १ ॥
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ।
पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥ २ ॥
तुम्हांसी जागविले आम्ही आपुलिया चाडा ।
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥ ध्रु० ॥
तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन ।
नाही निवडिले आम्हा आपुलिया भिन्न ॥ ४ ॥
पावला प्रसाद आता विठो निजावे । आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥ ध्रु० ॥