सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधू जल गगनी ।
कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।
सुरवर चर निशाचर त्या झाल्या पळनी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादे नाभे कृतांता जय देव जय देव ॥ धृ. ॥
दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ।
कडाडिले पर्वत उड्डगण उच्छेद ।
रामी रामदासा शक्तिचा शोध ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादे नाभे कृतांता जय देव जय देव ॥ धृ. ॥