निशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।
आज्ञेविना काळ ना नेई त्याला । परलोकीही ना भीती तयाला ॥ २ ॥
उगाची भितोसी भय हे पळू दे । प्रपंचीक संकटे सारी गळू दे ।
दयावंत हा स्वामी समर्थ राजा । पाठिराखा असे भाविकांचा ॥ ३ ॥
नको अंतरी काही चिंता विचार । स्वामी देतील तुजला अखंड आधार ।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ ४ ॥
श्री स्वामी समर्थ । जय जय स्वामी समर्थ ॥