मागे (Home)
श्री विठ्ठल (पांडुरंग)आरती~3 मिनिटे

युगे अठ्ठावीस (विठ्ठल आरती)

रचनाकार: संत नामदेव महाराज (Sant Namdev Maharaj)

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवा जीवा ॥ धृ. ॥

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनुमंत पुढे उभे ठाटी ॥ २ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवा जीवा ॥ धृ. ॥

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई सत्यभामा उभ्या दोही बागा ।

पुरविती मनकामना भक्तांच्या वेगा ॥ ३ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवा जीवा ॥ धृ. ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।

दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओंवाळिती ॥ ४ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवा जीवा ॥ धृ. ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस